कोविड-१९ महामारीमध्ये जगभरात जवळपास दीड कोटी बालके आई-वडिलांचा किंवा काळजीवाहू व्यक्तींचा मृत्यू झाल्याने अनाथ
भारताच्या संदर्भाने इव्हेंटच्या महापुरात कोविड महामारी आता कोणती तरी दूरस्थ घटना भासत असली तरीही, जगात अजूनही कोविड-काळात झालेल्या सामाजिक-आर्थिक उलथापालथींची मोजदाद केली जात आहे. घडलेल्या घटनांचे अर्थ लावून भविष्यातल्या आव्हानांचा अदमास घेतला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आधार गमावलेल्या बालकांच्या निराधार अवस्थेवर टाकलेला हा प्रकाशझोत.......